अ‍ॅडलेड मराठी विद्यालय

 

फेब्रुवारी २०१७ मध्ये काही स्वयंसेवकांनी स्वयंप्रेरणेने अडलेड मराठी विद्यालय सुरू केले. 

२०१९ पासून विद्यालयाला Community Languages association of South Australia ची शासकीय मान्यता मिळाली आहे.

विद्यालयाचा वाढता कारभार आणि पुढील योजनांमुळे २०२२ साली  कार्यकारिणी समितीने आपली पहिली घटना तयार केली आणि Associations act या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे अडलेड मराठी विद्यालयाची स्वतंत्र संघटना म्हणून नोंदणी केली.

आपण भारतात असताना हिंदी,मराठी इंग्लिश अशा कितीतरी भाषा सहज आत्मसात करतो. एकापेक्षा जास्त भाषा येणं हे मनोविकास व व्यक्तिमत्व विकासासाठी खूप महत्वाचे आहे असा आता भाषा शास्त्रज्ञांनी अनेक संशोधनातून दाखवून दिले आहे.

आमचे ध्येय मराठी भाषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे आत्मविश्वास, वक्तृत्व, आणि विचार करण्याची क्षमता वाढवणे आहे.

पालक, शिक्षक, आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने एक सशक्त शैक्षणिक समुदाय निर्माण करणे आहे.
  विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सण, आणि परंपरा यांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे आहे. 

मराठी भाषेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देणे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात मराठीचा वापर वाढवणे आहे.

आमच्या विद्यालयाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करतो. आम्हाला विश्वास आहे की, मराठी शिकण्याने विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य, सांस्कृतिक जाणीव आणि सामाजिक मूल्ये यांचे पोषण होते. 

We function during school term

Every Sunday at Charles Campbell College

3 Campbell Road, Paradise SA 5075 

Every Saturday at Torrens University

88 Wakefield St, Adelaide SA 5000